Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

महाराष्ट्र मंडळ द्वारका

March 02, 2017

Search by Tags:  Charity

महाराष्ट्र मंडळद्वारका

द्वारका ३६१ ३३५ (ओखा मंडळ)

रजिस्ट्रेशननं. E - ४५२ / Jamnagar

महाराष्ट्रमंडळद्वारका चा इतिहास

महाराष्ट्रमंडळ द्वारका या संस्थे चा इतिहास आपल्या समोर मांडत असतांना आम्ही तेथील जाणकार व्यक्तींशी चर्चा केली असता, श्री अनिल जांबेकरजी ,महाराष्ट्रमंडळ द्वारकाचे तत्कालीन अध्यक्ष यांनी अशी माहिती दिली कि, मंडळाच्या जागेचा प्लॉट (सर्वेनं. 16/3547) एका महाराष्ट्रीयन विधवा महिला ह्यांच्या मालिकी चा होता त्यांनी आपला हा प्लॉट 1967 साली तेथे असलेले द्वारका स्थित काही महाराष्ट्रीयन बांधवांना श्रीगणेश उत्सव, कोजागिरी, शिवजयंती सारखे कार्यक्रम करण्या साठी विना मूल्य वापरण्यास दिला. त्यानंतर तोच प्लॉट मंडळाला दान दिला त्यावेळी त्यांनी लिखित संमती पत्र महाराष्ट्र मंडळाच्या नावे मुखत्यारनामा करून दिला ह्याची तत्कालीन ग्रामपंचायत तसेच इतर खात्यानचे पदाधिकारी यांना जाणीव होती. परंतु दुर्भाग्याने या विषयाची नोंद चॅरिटी कमिशनर यांचे दप्तरी महाराष्ट्र मंडळाच्या नावे फेरबदल नोंद झाली नाही. तत्कालीन कार्यकर्ते यांच्या कडून याविषयाची योग्य दरकार घेतल्या गेली नाही हा प्लॉट महाराष्ट्र मंडळ द्वारकाच्या नावें होऊ शकला नाही.

श्री जांबेकर यांचे मते ज्या वेळी श्री कारखानीस यांनी महाराष्ट्रमंडळ द्वारका चा कारभार श्री जांबेकर यांना सोपवला त्यावेळी हा प्लॉट महाराष्ट्रमंडळद्वारका यांचे नावे नव्हता. तत्कालीन अध्यक्ष श्री अनिल जांबेकर उपाध्यक्ष श्री सरोदे(न्यायाधीश) यांनी योग्य ती दरकार घेऊन 1984 साली हा प्लॉट महाराष्ट्रमंडळद्वारका यांचे नावे करून चॅरिटी कमिशनर यांचे दप्तरी फेरबदल करून घेतला.

द्वारका येथे एसीसी सिमेंट फॅक्टरी होती आणि पोटा पाण्या साठी दूरसुदूर भागातून आलेले काही महाराष्ट्रीयन श्रमिक बांधव येथे कार्यरत होते. ज्यांना मायबोली मराठी मराठी संस्कृती चा लळा होता ते एकत्र होऊन आपले सण सांस्कृतिक कार्यक्रम-दिवाळी, दशहरा, श्री गणेश उत्सव, कोजागिरी, शिवजयंती साजरे करीत होते. अश्या प्रकारे महाराष्ट्रमंडळद्वारका ची सुरुवात जवळपास1955 ची आहे. परंतु दुर्दैवाने या बाबती चा कागदी पुरावा दप्तरी नाही. आपण आपल्या मंडळाच्या या अनामी शिल्प कारयांचे आभारी आहोत सदैव ऋणी राहू.

या प्रवाहात काही काळानंतर शिक्षित सुपरवायझर अधिकारी वर्ग येथे आले त्यांनी मंडळाला योग्य आकार देण्याचा प्रयत्न केला. होतकरू कार्याची जाणीव असलेल्या महाराष्ट्रीयन बांधवानी पुढाकार घेऊन 1981 सालीमददनीश चॅरिटी कमिशनरजामनगर यांचे दप्तरी महाराष्ट्रमंडळ - द्वारका'या नावाने संस्था रजि. क्र.E/452/ जामनगर तारीख 18/03/1981 रोजी 'नोंदणी करून घेतली

अश्या प्रकारे 'महाराष्ट्रमंडळ - द्वारका' या संस्थेची स्थापना/ कायदेशीर नोंदणी 18/03/1981साली तत्कालीन कार्यरत महाराष्ट्रीयन मंडळीयांनी करून घेतली. या वेळी दप्तरी असलेल्या काही ठराविक होद्देदार सभासदांची नांवे अशी आहेत.

प्रथम कमिटी (18.03.1981) ( PTR अनुसार )

1)श्री एस.बी.कारखानीस, 2) श्री डी. वि.फणसे, 3) श्री डी. बी.महाडिक, 4) श्री एस..चौहान,

5) श्री आर.एम.आंबेगावकर, 6) श्री पी.वि.परुळकर, 7) श्री आर.एम.खटवकर, 8) श्री एच.बी. वैद्य

द्वितीय कमिटी (10.06.1983) ( PTR अनुसार )

1) श्री अनिल एम.जांबेकर, 2) श्री जे.जी.साठे, 3) श्री डी. बी.महाडिक, 4) श्री एस.पी.जोगळेकर, 5) श्री चौहान, 6) श्रीएच.बी.वैद्य, 7) श्री फणसे, 8) श्री बी.जी.फणसे, 9) श्री शिंदे, 10) श्री एस..चौहान

तिसरीकमिटी(10.02.1986) ( PTR अनुसार )
1) श्री के.आर.देसाई, 2) श्री डी.वि.फणसे, 3) श्री डी. बी.महाडिक, 4)श्री शिंदे, 5)श्री चौहान,

6)श्री एस.पी.जोगळेकर, 7)श्री अनिल एम.जांबेकर, 8)श्री आर.एम.आंबेगावकर, 9)श्री डी.के.देशमुख, 10) श्री बी.आर.पाटील

महाराष्ट्र मंडळ द्वारकाच्या वरील दर्शविलेल्या कमिटीच्या निवडणुका कार्याची नोंद चॅरिटी कमिशनर दप्तरी नियमित पणे करण्यात आलेल्या आहेत शेवटची फेर बदल नोंद 1986 पर्यंतची आहे मंडळच्या बंधाऱण प्रमाणे जी 1989 पर्यंतच मान्य होती. परंतु काही कारणाने एसीसी सिमेंट कंपनी सन1989 साली बंद करण्यात आली आणि स्वाभाविक पणे कंपनीत कार्यरत महाराष्ट्रीयन मंडळीयांनी द्वारका येथून स्थलान्तर केले

द्वारका सोडणारे शेवटचे व्यक्ती श्रीअनिल एम.जांबेकर यांनी मंडळाचा सर्व कारभार दप्तर
डॉ. श्री अनिल गंधे (मिठापूर) यांना सोपवले.डॉ. श्री अनिल गंधे यांनी मंडळाच्या कार्यात चिकाटीने भाग घेतला बऱ्याच प्रयत्नाने जागेच्या भोवती भिंत काही खोल्या बांधून घेतल्या. आणि मंडळास उत्पन्नाची सोय म्हणून काही खोल्या शिशु मंदिर यांना शिक्षण कार्य साठी भाड्याने सन2002 ते सन 2014 पर्यंत देण्यात आल्या.

डॉ. श्री अनिल गंधे हे सन 2002 साली सेवा निवृत्त झाले असता 'महाराष्ट्र मंडळ - द्वारका' चे सर्व दप्तर मंडळाचा कारभार मिठापूर स्तिथ श्रीगोपाळ के. प्रभुणे यांना सोपवून आपल्या मूळ कायम वास्तव्य असे इंदोर मध्यप्रदेश येथे निघून गेले. श्री गोपाळ प्रभुणे हे सन 2002 पासून ते आज मितीस 2016 पर्यंत 'महाराष्ट्रमंडळ - द्वारका' चा संपूर्ण कार्यभार दक्षतेने पार पाडीत आहेत.

'महाराष्ट्रमंडळ - द्वारका' च्या परिसरात शिशु मंदिर हि शाळा सन 2014 पर्यंत कार्यरत होती. 2014 मध्ये ही शाळा स्वताच्या बिल्डिंग मध्ये गेली. त्या नंतर एका NGO संस्थेस( सेवा भारती) याच परिसरात ''महाराष्ट्र धर्मशाळा"या नावानेचालवण्यास भाड्याने देण्यात आली. सध्या ही संस्था मंडळाच्या जागेत कार्यरत आहे.ह्या कार्यासाठी ते जागा रिकामी करणार आहेत.

डॉ. श्रीअनिल गंधे श्री गोपाळ प्रभुणे आणि सहकार्यकर्ते यांनी मिठापूर मधे राहूनहि 'महाराष्ट्रमंडळ - द्वारका' ची गरिमा स्वतंत्र ओळख टिकवून आपले कार्य करीत राहिले त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभारी आहोत त्यांचे हे कार्य अतिशय गौरवास्पद आहे.

श्री गोपाळ प्रभुणे हे आपले सहकार्यकर्ते श्री महेश देशपांडे, श्री विवेक देव, आणि श्री रमेश पडवळ यांना सोबत घेऊन मंडळाचे सर्व कार्य पाहत होते पण कायदाकीय बाबतीत अजाण असल्या मुळे वेळेच्या अभावी, चॅरिटी कमिशनर ह्यांच्या दप्तरी ह्या फेरबदलची नोंदणी करण्यास राहून गेली तसेच पुढील कार्य करीत राहिले. पुढे मात्र त्यांना आणि त्यांच्या सह कार्यकर्ता ना मंडळाचे काम सांभाळणे कठीण जाऊ लागले,
जेणे करून मंडळाचा विकास बहुमूल्य जागेचा सदुपयोग वेळ आणि पुरते आर्थिक भांडवलाच्या अभावी होऊ शकला नाही. तद नंतर श्री गोपाळ प्रभुणे यांनी अखिल सौराष्ट्र महाराष्ट्रमंडळभावनगर, बृहन महाराष्ट्रमंडळ दिल्ली यांचे कार्यकर्ते तसेच श्री आर.आऱ॰कोलते अध्यक्षमहाराष्ट्रमंडळ-राजकोट यांचा महाराष्ट्रमंडळ द्वारकाचे संचालन सांभाळ करण्या साठी संपर्क केला परंतु काही कारणा स्तव या कामाची पुढे प्रगती होऊ शकली नाही. श्री आर.आऱ॰कोलते अध्यक्षमहाराष्ट्रमंडळ-राजकोट यांनी तेंच्या परीने पुष्कळ प्रयत्न केले पणत्यांच्या खराब तब्येती मुळे त्यांना शक्य झाले नाही. 11/03/2014 रोजी श्री आर.आऱ॰कोलते यांचे निधनझाल्याने तो प्रयत्न संपुष्टात आला .

श्री गोपाळ प्रभुणे हे 2014 साली श्री दत्तात्रय जोशी श्रीवाघमारे, सभासद
महाराष्ट्र मंडळ - राजकोट यांच्या संपर्कात आले आणि 'महाराष्ट्रमंडळ - द्वारका' या विषयावर सविस्तर चर्चा झाली असता, श्रीजोशी श्री वाघमारे यांनी संपूर्ण दप्तरचा अभ्यास केला मृत:प्राय 'महाराष्ट्रमंडळ - द्वारका' ला पुनः सजीवन कसे करता येणार याचा मार्ग शोधण्याचे प्रयत्न चालू केले. त्यात अतिशय महत्वाची बाब म्हणजे 'महाराष्ट्रमंडळ - द्वारका' च्या मूळ घटणे मधे असलेली कलम "कोणताही महाराष्ट्रीयन माणूस कि जो द्वारका येथे वास्तव्य करीत नाही तो सुध्दा 'महाराष्ट्रमंडळ - द्वारका' चा प्रवासी ( visiting) सभासद बनू शकतो पण त्याला मत देण्याचा अधिकार नाही " ह्या कलमा मुळे चॅरिटी कमिशनर समोर आपली केस/बाजू मांडण्याचे सोयीस्कर झाले.

सर्वप्रथम'महाराष्ट्रमंडळ - द्वारका' च्या विकास कार्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या जवळ पासचे महाराष्ट्रीयन व्यक्तींची यादी तयार केली त्यांना 'महाराष्ट्रमंडळ - द्वारका' चे आजीवन प्रवासी ( visiting) सभासद होण्याचे आवाहन करून सदस्य केले.( एकूण 60) त्या नंतर पुढचा प्रश्न चॅरिटी कमिशनर समोर असा मांडला कि:

1) नियमित पुरते सभासदांच्या अभावीप्रवासी सभासद कमिटी बनवू शकतील कि नाही?

2) प्रवासी सभासद ट्रस्टी बनून मंडळा चा विकास स्थावर मिळकतचे जतन करून संस्था
चालवू शकतील कि नाही?

कारण हे जर शक्य नसेल तर मंडळाच्या अस्तित्वावरच प्रश्न चिन्ह लागेल.
श्री जोशी, श्री प्रभुणे श्री वाघमारे यांचे अविरत प्रयास चॅरिटी कमिशनर ह्यांच्या दप्तरी विचारण्यात आलेल्या अनेक प्रश्नाची विधिसर लिखित उत्तरे देऊन तसेच अनेक वेळा प्रत्यक्ष मुलाकात घेऊन अखेरीस जॉईंट चॅरिटी कमिशनरराजकोट यांनी आदेश बाहेर पाडला कि "भारत देशाच्या कोणत्याही भागातील कोणी हि महाराष्ट्रीयन बांधव ह्या 'महाराष्ट्रमंडळ - द्वारका' चा आजीवन सभासद होऊ शकेल व ट्रस्टी म्हणूनमंडळाच्या विकास आणि हितार्थ योग्य तो सर्वमान्य निर्णय घेण्यास सक्षम राहतील"

चॅरिटी कमिशनर यांच्या ह्या ऐतिहासिक आदेशा अनुसार 'महाराष्ट्रमंडळ - द्वारका' या संस्थेची सभासद यांची यादी कमेटी चे प्रस्तावित सभासद म्हणून चॅरिटी कमिशनर यांना सोपवण्यात आली जी कमेटी त्यांनी पुढील महिने म्हणजे' 30 नोव्हेंबर 2016 'पर्यंत मान्य ठेवली. )

नवीन कमिटी सभासद:

1)श्री गोपाळ प्रभुणे ,2) श्री विवेक देव, 3) श्री महेश देशपांडे 4) श्री रमेश पडवळ,5)श्रीदत्तात्रय जोशी,

6) श्री एल.डी. वाघमारे, 7) श्री अनिल पाटील,8) श्री राजू पाटील, 9) डॉ. श्री अनिल गंधे.
ह्या पैकी श्री विवेक देव यांना17/11/2016 रोजी फक्त 55 वर्षाच्या वयात देवाज्ञा झाल्याने आमच्या
प्रगतीत अडथळा आला. ईश्वर त्यांनाशांति आणि परिवारास दुख: सहन करण्याची शक्ति देवो.

महाराष्ट्र मंडळ द्वारका चे लक्ष उद्देष्य


|| मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा ||


द्वारकेसारख्या पुण्य नगरीत श्रद्धाळू म्हणून येणार्‍या मराठी माणसास थांबण्या साठीव्यवस्थित जागा आणि मराठी अस्मितेची जाणीव करून देणारे श्री गणेश
,श्री दत्त आणि श्री विठ्ठल रखुमाईचे मंदिर बांधणे असाआहे. मंडळा जवळ एकूण 125 x 95 =12000 चौ.फूटचीजागा आहे त्याचे नवीनी करण, जवळपास 500 प्रवासी / यात्राळु यांची राहण्याची सोय होईल असे सुंदर सर्वसोयीअसलेले प्रवासी गृह बांधून घेणे, या प्रवासी गृहात श्रीगणपती मंदिर, श्रीदत्तात्रय मंदिर श्री विठ्ठल रखुमाई मंदिर बनवणे. मंडळाचा सर्वांगिण विकास करणे मराठी अस्मितेची महाराष्ट्रा बाहेर जोपासना करणे.

या विशाल ध्येयाला लक्षात घेऊन दि. 16 ऑक्टोबर 2016 रविवार रोजी राजकोट येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत सौराष्ट्र परिसरातील सर्व अधिकृत महाराष्ट्र मंडळयांचे प्रतिनिधी यांना आमंत्रण देऊन बोलावून एकत्र करण्यात आले. या बैठकीत खालील मंडळांचे प्रतिनिधी हजर होते
1)
महाराष्ट्र मं. मिठापूर, 2) महाराष्ट्र मं.राजकोट,)महाराष्ट्र मं-अमरेली,4)महाराष्ट्र मं-जामनगर,
5)अखिलसौराष्ट्रमहाराष्ट्रीयन मं-भावनगर, 6) महाराष्ट्रमंडळ - अहमदाबाद,

ह्या सभे मध्ये महाराष्ट्र मंडळ द्वारकाच्या विकासा साठी अधिकृत ट्रस्टी सभासद निवडणे, तसेच नवीन आजीवन सभासद बनवणे या विषया वर सविस्तर चर्चा करण्यात आली.

महाराष्ट्र मंडळाचेअध्यक्ष श्री जोशी यांनी आत्ता पर्यन्त झालेल्या घटना आणि पुढील नक्की केलेलेलक्ष्य ह्याची सर्वांना जाण करून दिली. ह्या सभे मध्ये वरील मंडळांचे प्रतींनिधी आणि महाराष्ट्र मंडळद्वारका चे जुने प्रवासी (आता आजीवन) सभासद पण उपस्थित होते. वास्तव मध्ये सगळ्यासभासदांना सर्व आयोजन माहीत होते कारण हे प्रकरण गेल्या दोन वर्षा पासूनसगळ्यांच्या चरचेचा भाग होता. परवानगीमिळाल्यावर काय करायचे ? कशे करायचे? हा विषय व त्यावरघ्यायचे निर्णय अधिकान्श कार्यकर्त्यांना माहीत पण होते आणि मान्य पण होते पण त्यावरचा लेखित पुरावा म्हणून :-

श्री जोशी यांनी प्रस्ताव मांडला कि वरील मंडळानंपैकी 1 आणि 6 यांचे प्रत्येकी एक सभासद 2 ते 5 यांचेप्रत्येकी दोन सभासद ट्रस्टी म्हणून घ्यावे .आणि ज्या त्या मंडळानेआपल्या लेटरपॅड वर ट्रस्टी इतर होत करू कार्यकर्ते यांची नांवे सूचित करावी जे महाराष्ट्र मंडळ द्वारकाचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून कार्य करण्यास सक्षम राहतील. उपस्थित सर्व सभासदांनी यास आपली सहमती दिली. 13/11/2016 ची सभा प्रथम वार्षिक सभा असेल आणि त्यातचविश्वस्त ( ट्रस्टी) ह्यांची नावे जाहीर केली जातील, असे ठरले. वरील ठराव सर्व संमती ने मंजूर करून पुढची बैठक दि. 13/11/2016 रविवार रोजी राजकोट येथे घेण्याचे ठरवलेत्या अनुसार राजकोट येथे बैठक घेण्यात आली. या बैठकी हजर असलेल्या सभासदांच्या बहुमताने खाली दिलेल्या मान्यवरयांची ट्रस्टी म्हणून नेमणूक करण्यात आली आणि या संदर्भात जरुरी संमती पत्र सभासदा कडून लिहून घेऊन हे सर्व प्रतिनिधींची नांवे मददनीश चॅरिटी कमीशनरजामनगर यांचे दप्तरी लिखित नोंदणी करीता पाठवण्याचे ठरवले.

नवीन ट्रस्टीकमिटी (13.11.2016)

1) श्री गोपाळ कृष्ण प्रभुणे (मिठापूर), 2) श्री सुरेश सोनार (जामनगर), 3)श्री विवेक बुचके (जामनगर)
4) श्री दत्तात्रय जोशी (राजकोट) 5) श्री एल.डी. वाघमारे (राजकोट) 6) श्री मानसिंगराव पवार (अमरेली)
7) श्री वरे (अमरेली) 8) श्रीराजेश के.पाटील (मोरबी) 9) श्रीनरेंद्र एस.गोळवलकर(अहमदाबाद)
10) श्रीमहेंद्र कापुरे (भावनगर)

आत्ता पर्यन्त द्वारका नगर ,जामनगरतालुक्यात संलग्न होते व त्याचा नोंधणी नंबर ई/452/जामनगर होता परंतु सध्या तेदेवभूमी द्वारका या नव्या नावाने परिवर्तीत झालेल्या द्वारका तालुक्यात समाविष्टझाले असून त्याचा नवा नोंधणी नंबर ई/183/देवभूमी द्वारका असा परिवर्तीत झाला आहे.लवकरच सहायक चेरिटी कामिश्न्र्र देवभूमीद्वारका चे नवे ऑफिस चालू होईल तो पर्यन्त दोन्ही नोंधणी नंबर टाकावेत अशी सूचनाआहे

भवनासाठी एकत्र केलेलानिधि दुसरी कडे वापरला जाऊ नये या हेतूने द्वारका महाराष्ट्र मंडल याचे वेगळेकरेण्ट एकौट State bank of India च्या Devbhumi Dwarka शाखेत खोलण्यात आले आहेCURRENT A/No 00000036319363616 IFSC Code SBIN060090 असा आहे. त्यात रक्कम टाकून आम्हाला कळविल्यास आपणास पक्की रसीद व एक कार्ड पाठवण्यात येईल. ते कार्ड दाखवूनवास्तु तयार झाल्यावर आपणास योग्य ती सवलत घेता येईल.
मंडळाचा email IDmahamandal_dwarka@yahoo.comअसा आहे


Search by Tags:  Charity
Top

maharashtra mandal dwarka's Blog

Blog Stats
  • 2651 hits
Archives